Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
Tokyo पॅरालिम्पिक: अवनी लेखराने नेमबाजीत रचला इतिहास
03-Sep-2021, 1:47:35 pm
Edited by - Pravin wankhede
Tokyo Paralympic मध्ये नेमबाज अवनी लेखराने पदक जिंकले आहे.
Abhijeet Bharat

टोकियो: टोकयो पॅरालिम्पिकमध्ये १९ वर्षीय अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदकानंतर कांस्यपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. ५० मीटर्स एअर रायफल स्पर्धेत अवनीने कांस्य पदकाची कमाई केली आहे. अवनीच्या दमदार कामगिरीनंतर भारताच्या खात्यात १२ वं पदक जमा झालं आहे.

अवनी लेखरा ही पॅरालिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पहिला महिला खेळाडू ठरली आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या. पात्रता फेरीत अवनी लेखरा ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात बारावं पदक आलं आहे.

अवनी लेखराने सोमवारी येथे टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले होतं. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

कोण आहे अवनी लेखरा

अवनी लेखरा ही राजस्थानची राजधानी जयपूरमधील आहे. अवनी११ वर्षांची असताना, तिचा अपघातात झाला होता. या अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती ज्यामुळे तिला अर्धांगवायू झाला. अवनीला तिच्या वडिलांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी या दोन्हीमध्ये खेळांमध्ये रस दाखवला होता. पण शेवटी तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले. अवनी महिलांच्या १० मीटर एअर स्टँडिंग शूटिंगच्या एसएच१ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.