Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
Biological E च्या ५ ते १८ वर्षांच्या मुलांसाठीच्या लसीला DCGI ची मंजुरी
02-Sep-2021, 5:14:28 pm
Edited by - Pravin wankhede
भारतात ५ वर्षांपासून ते १८ वर्षांच्या मुलांसाठी विकसित केलेली कोरोना लस दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी DCGI कडून मंजुरी देण्यात आली आहे. (DCGI approval for Biological E vaccine for children aged 5 to 18 years)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: कोरोना महामारीची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. ही लाट लहानमुलांना अधिक धोकादायक असल्याचे सांगितल्या जात आहे. अशात लहान मुलांना कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी लसीकरण करणे हा त्यावर उपाय सांगितल्या जात आहे. त्यामुळे  ५ वर्षांपासून ते १८ वर्षांच्या मुलांसाठी विकसित केलेली कोरोना लस दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी DCGI कडून मंजुरी देण्यात आली आहे. ही लस हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई लिमिटेडने तयार केली आहे. या लसीची चाचणी देशभरात १० ठिकाणी केली जाणार आहे. कोविड -19 वर विषय तज्ज्ञ समितीकडून (एसईसी) मिळालेल्या सूचनांनंतर, डीसीजीआयने लसीच्या चाचणीला परवानगी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बायोलॉजिकल ई लिमिटेडची ‘कार्बेव्हॅक्स’ लस सप्टेंबरच्या अखेरीस भारतात लाँच केली जाऊ शकते. कार्बाव्हॅक्स ही स्पाइक प्रोटीनपासून बनलेली पहिली कोरोना लस असून ही देशातील सर्वात स्वस्त किमतीत उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने ‘कार्बेव्हॅक्स’ लसीच्या ३० कोटी डोसच्या पुरवठ्यासाठी १५०० कोटी रुपयांचे आगाऊ पैसे देखील दिले आहेत.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.