Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
आणखी एक संकट! डेल्टापेक्षाही धोकादायक आहे कोरोनाचा C.1.2 व्हेरिएंट
02-Sep-2021, 2:32:37 pm
Edited by - Smruti Chobitkar
देशासह जगभरात (Worldwide) अद्यापही कोरोनाच्या (Coronavirus) डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) धोका कायम आहे. अशात आता आणखी एका नव्या व्हेरिएंटचे (New Variant of Covid19) संकट संपूर्ण जगावर आले आहे. कोरोनाच्या C.1.2 या नवीन व्हेरिएंटमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे.
Abhijeet Bharat

नवी दिल्ली : देशासह जगभरात अद्यापही कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) धोका कायम आहे. अशात आता आणखी एका नव्या व्हेरिएंटचे (New Variant of Covid19) संकट संपूर्ण जगावर आले आहे. कोरोनाच्या C.1.2 या नवीन व्हेरिएंटमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात C.1.2 व्हेरिएंटचा एकही रुग्ण नोंदवण्यात आलेला नाही.

वृत्तसंस्था पीटीआयने आपल्या अहवालात सांगितले होते की, दक्षिण आफ्रिकेसह इतर अनेक देशांमध्ये कोरानाचा एक नवीन व्हेरिएंट आढळला आहे. हा व्हेरिएंट अत्यंत संक्रमक असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीज (एनआयसीडी) आणि क्वाझुलू-नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्म (केआरआयएसपी) येथील वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, सार्स-सीओव्ही - 2 सी (SARS-CoV-2c) ची नवीन व्हेरिएंट अधिक संक्रमक असू शकतो आणि सध्याच्या कोरोना लसीच्या सुरक्षेलाही हा व्हेरिएंट मात देऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

कोरोनाचा C.1.2 हा नवीन व्हेरिएंट सर्वात आधी मे महिन्यात आढळून आला होता, असे वैज्ञानिकांनी सांगितले. तेव्हापासून १३ ऑगस्टपर्यंत कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्ये आढळून आला आहे.

दरम्यान, आगामी काळात कोरोनाचे आणखी नवीन व्हेरिएंट आढळून येऊ शकतात, असा जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आगामी काळात जगभरात कोरोनाचे अधिक धोकादायक व्हेरिएंट पसरू शकतात. ही जीवघेणी महामारी जगातून लवकरच संपणार नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

     

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.