Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
दिल्ली सरकारचा पुढाकार; सोनू सूद 'देशाचे मेंटोर' मोहिमेचा ब्रँड ॲम्बेसेडर
27-Aug-2021, 8:00:23 pm
Edited by - Smruti Chobitkar
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याची 'देशाचे मेंटोर' (Desh Ke Mentor) मोहिमेचा ब्रँड ॲम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. (arvind kejriwal announces sonu sood as brand ambassador for desh ke mentors program)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी दिल्ली सरकारने पुढाकार घेतला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याची 'देशाचे मेंटोर' मोहिमेचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.

दिल्ली सरकारच्या पुढाकाराने 'देशाचे मेंटोर' मोहिमेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमाबद्दल विस्ताराने माहिती देताना सोनू सूद म्हणाला, 'आज मला लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा मोठी सेवा नाही. मला खात्री आहे की आपण एकत्र मिळून हे करू शकतो आणि नक्कीच करू.'

मोहिमेबाबत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, 'सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले अत्यंत गरीब कुटुंबातून येतात. या मुलांच्या कुटुंबात त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी खूप कमी लोक असतात. अशा परिस्थितीत आम्ही देशातील सुशिक्षित लोकांना आवाहन करत आहोत की तुम्ही पुढे येऊन सरकारी शाळेतील एक, दोन, तीन किंवा जास्तीत जास्त मुलांचे मार्गदर्शक व्हा. त्यांचे फोनवर मार्गदर्शन करा. मुले देखील फोनद्वारे तुमच्या संपर्कात राहतील. तणावपूर्ण परिस्थितीतही तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता.'

केजरीवाल पुढे म्हणाले, सोनू सूद 'देशाचे मेंटोर' मोहिमेचा ब्रँड ॲम्बेसेडर बनण्यास तयार आहे आणि तो स्वतः काही मुलांना मार्गदर्शन करेल आणि देशभरातील लोकांना मार्गदर्शक होण्याचे आवाहन करेल.

सप्टेंबरच्या मध्यापर्यंत होणार लॉन्च
मोहिमेबद्दल बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून 'देशाचे मेंटोर' हा कार्यक्रम सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून चालत होता. हा पायलट प्रोजेक्ट खूप यशस्वी झाला. या मोहिमेशी संबंधित सर्व मार्गदर्शकांना उत्तम अनुभव होता आणि मुलांनाही एक चांगला अनुभव मिळाला. आता काही दिवसांनी 'देशाचे मेंटोर' मोहिम सप्टेंबरच्या मध्यापर्यंत लॉन्च करण्यात येणार आहे.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

     

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.