Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान 
24-Aug-2021, 1:09:58 pm
Edited by - Pravin Wankhede
केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे तो कदापि सहन केला जाणार नाही
Abhijeet Bharat

मुंबई: केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे तो कदापि सहन केला जाणार नाही असे सांगतानाच कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी माहिती  मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यानंतर नवाब मलिक यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याचपध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

नारायण राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही हे भाजपला कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.