Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
मुख्यमंत्र्यांविरोधात  नारायण राणे यांचे खळबळजनक वक्तव्य, गुन्हा दाखल,अटकेची शक्यता
24-Aug-2021, 11:49:09 am
Edited by - Pravin Wankhede
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत(Chief Minister Uddhav Thackeray) केलेल्या वादग्रस्त ( sensational statement) विधानाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून लागले आहेत.
Abhijeet Bharat

चिपळूण:  जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून लागले आहेत.  राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते.

 

 

त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत युवा सेनेच्या वतीने आंदोलन पुकारलं आहे. यासह राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. राज्यात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

नाशिक मध्ये गुन्हा दाखल

नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात नाशिक पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या गुन्हाची गंभीर दखल घेऊन नाशिक पोलीस आयुक्तांनी पोलीस उप-आयुक्त नेमूण नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. सुधाकर बडगुज यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्यावर १५३, १८९, ५०४, ५०५(२) आणि ५०६ या कलमांतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले नारायण राणे

“मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही?, अटक करणार म्हणून चालवताय सामान्य माणूस वाटलो का तुम्हाला? तुम्ही माझी बदनामी केली तर त्याधी माझा गुन्हा तुमच्याविरोधात दाखल होईल” असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी माध्यमांना दिला.

Abhijeet Bharat

नेमकं काय म्हणाले होते  नारायण राणे

या माणसाकडे कोणतीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची हालत गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते 10 वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लस नाही अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे.' असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

त्यानंतर पुढे ते असं म्हणाले की, 'या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना? मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.' असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.