Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
भारतीय लष्करात पहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांची कर्नलपदी बढती
23-Aug-2021, 8:41:57 pm
Edited by - Pravin Wankhede
भारतीय लष्कराच्या( Indian Army,) निवड मंडळाने पाच महिला अधिकाऱ्यांना(woman officer) त्यांनी लष्करात 26 वर्ष मानाची सेवा पूर्ण केल्यानंतर  त्यांना कर्नल (टाइम स्केल) पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे.(promoted to the rank of Colonel)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या निवड मंडळाने पाच महिला अधिकाऱ्यांना त्यांनी लष्करात 26 वर्ष मानाची सेवा पूर्ण केल्यानंतर  त्यांना कर्नल (टाइम स्केल) पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सिग्नल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियंता (ईएमई) या तुकड्यांमध्ये कार्यरत महिला अधिकाऱ्यांना कर्नल (टाइम स्केल) श्रेणी मंजूर होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी, केवळ लष्करी वैद्यकीय सेवा तुकडी, न्यायाधीश महाधिवक्ता आणि लष्कराची शिक्षण विषयक तुकडी या तुकड्यांमध्ये सेवा बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनाच कर्नल पदावर बढती दिली जात होती.

भारतीय लष्कराने बढती देण्यासाठी अधिक शाखांच्या विस्ताराचा निर्णय घेणे हे महिला अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक संधींमध्ये वाढ होण्याचे निदर्शक आहे. भारतीय लष्कराच्या बहुतांश शाखांमधील महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्याच्या यापूर्वी घेतलेल्या निर्णयासोबत, आताच्या या नव्या निर्णयाने, भारतीय लष्कराचा लिंग-निरपेक्ष लष्कर घडविण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होतो आहे.

कर्नल (टाइम स्केल) पदावर बढतीसाठी निवड झालेल्या महिला अधिकाऱ्यांची नावे  सिग्नल तुकडीतील लेफ्ट.कर्नल संगीता सरदाना, ईएमई तुकडीतील लेफ्ट.कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्ट.कर्नल नवनीत दुग्गल, कॉर्प अभियंता तुकडीतील  लेफ्ट. कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्ट.कर्नल रिचा सागर अशी आहेत.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.