Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
...म्हणून Infosys चे CEO सलील पारेख यांना वित्त मंत्रालयाचा समन्स
23-Aug-2021, 2:49:18 pm
Edited by - Pravin Wankhede
वस्तू व सेवा कर(Goods and Services Tax) अर्थात GST प्रणालीसाठी जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) संकेतस्थळ तयार करणार्‍या इन्फोसिसवर, २0१९ साली प्राप्तिकराच्या ई-भरणा करणारी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. (Infosys CEO Salil Parekh)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी व गतिमान करण्याच्या उद्देशाने ७ जूनला सायंकाळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळाची पहिली अनुभूती करदात्यांसाठी त्रासदायकच ठरली होती. पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या तक्रारींची रीघ पाहता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणार्‍या इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि तिचे विद्यमान अध्यक्ष नंदन निलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारत, अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश दिले होते.

अडीच महिन्यानंतरही करदात्यांना प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्थ मंत्रालयाने याची दखल घेत इन्फोसिसचचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सलील पारेख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले असून समन्स बजावले आहे. सलील पारेख यांना २३ ऑगस्टला अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासमोर हजर होण्यास सांगितले आहे.
सलील पारेख यांनी यावेळी निर्मला सीतारमन यांच्यासमोर लाँच होऊन अडीच महिने झाल्यानंतरही ई-फायलिंग पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी अद्याप दूर का झाल्या नाहीत याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीसाठी जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) संकेतस्थळ तयार करणार्‍या इन्फोसिसवर, २0१९ साली प्राप्तिकराच्या ई-भरणा करणारी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. करदात्यांकडून दाखल होणार्‍या विवरण पत्रावर प्रक्रियेचा कालावधी सध्याच्या ६३ दिवसांवरून एक दिवसांवर आणून, त्यायोगे कर-परतावा (रिफंड) वितरित करण्याची प्रक्रियाही गतिमान करण्याचे उद्दिष्ट यामागे होते. त्यानुसार तयार केले गेलेले नवीन संकेतस्थळ ७ जूनच्या रात्रीपासून कार्यान्वितही झाले. मात्र नवीन ई-फायलिंग संकेतस्थळावर लॉग इन करण्यात असर्मथता आणि त्याच्या वापरासंबंधाने अनेक प्रकारच्या अडचणींचा करदात्यांना सामना करावा लागत असल्याने दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच अर्थमंत्री सीतारामन यांच्या ट्विटर टाइमलाइनवर तक्रारींची रीघ लागली होती.


अर्थमंत्र्यांनी ट्वीटद्वारेच या बाबतीत आपला संताप व्यक्त केला होता. इन्फोसिस आणि नंदन निलेकणी हे दर्जेदार व गुणात्मक सेवेची अपेक्षा राखणार्‍या करदात्यांचा हिरमोड करणार नाहीत अशी आशा आहे, असे त्यांनी ट्वीट केले होते. निर्मला सीतारमण यांच्या ट्विटला उत्तर देताना इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि विद्यमान अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी म्हटले होते की, निर्मला सीतारमणजी नवीन ई-फायलिंग पोर्टल फायलिंग प्रक्रिया सुलभ करेल तसेच वापरकर्त्यांना चांगला देईल. पहिल्या दिवशी काही तांत्रिक त्रुटी आमच्या लक्षात आल्या असून त्यांचे निराकरण करण्याचे काम करत आहोत. आलेल्या अडचणींबद्दल इन्फोसिस खेद व्यक्त करत असून पुढील आठवड्यात यंत्रणा स्थिर होईल अशी आशा आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.