Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
आनंदवार्ता! भारतीय व दक्षिण आशियाई पर्यटकांसाठी आजपासून मालदीव खुले
15-Jul-2021, 8:30:23 pm
Edited by - Smruti Chobitkar
मालदीव (Maldive) त्याच्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. या बेटावर सुट्टीसाठी भारतातील अनेक दिग्गज कलाकार भेट देतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने त्रस्त झालेल्या मालदीवने पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले होते. (good news maldives open for indian and south asian tourists from today)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे जगभरातील पर्यटन स्थळे बंद आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाची आवड असणारे लोक गेल्या एक ते दीड वर्षांपासून कंटाळवाणे झाले आहेत. याच लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय आणि दक्षिण आशियाई पर्यटकांसाठी आजपासून मालदीव खुले करण्यात आले आहे. मालदीव सरकारने आजपासून भारतासह दक्षिण आशियाई देशांमधील पर्यटकांना व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.

मालदीव सरकारने १५ जुलैपासून दक्षिण आशियाई आणि भारतीय पर्यटकांच्या पर्यटनासाठी पर्यटक व्हिसा देण्याची घोषणा केली होती. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयानुसार, मालदीव पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना त्यांचा नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखवावा लागेल. हा अहवाल त्यांच्या देशात येण्यापूर्वी ९६ तासापेक्षा जास्त जुना नसावा.

Abhijeet Bharat

एका अहवालानुसार, मालदीवला येणाऱ्या पर्यटकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप ट्रेसीकी डाऊनलोड करावा लागेल. तसेच सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालावा लागेल. बरेच देश भारतीय पर्यटकांना टूरिस्ट व्हिसा देत आहेत. आता या क्रमवारीत मालदीवचीही भर पडली आहे. मालदीव हे भारतीय पर्यटकांसाठी सर्वाधिक पसंतीच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. त्यामुळे मालदीवला पर्यटनासाठी जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

कोरोनाची रुग्णवाढ पाहता मालदीवने मे महिन्यापासून सर्व दक्षिण आशियाई देश आणि भारतीतील पर्यटकांच्या प्रवासावर बंदी घातली होती. मालदीव आगमनावर व्हिसा देतो. भारतीय पर्यटकांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी कन्फर्म हॉटेल आरक्षण आणि वैध परतीच्या तिकिटाची आवश्यकता असेल.

Abhijeet Bharat

मालदीव त्याच्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. या बेटावर सुट्टीसाठी भारतातील अनेक दिग्गज कलाकार भेट देतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने त्रस्त झालेल्या मालदीवने पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले होते. मालदीवची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे कोरोना महामारीमुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.