Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Tuesday
07-12-2021
Abhijeet Bharat Logo
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब कर्नाटक : चिक्कमंगळूर येथील शाळेतील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली; यात ९० विद्यार्थी आणि ११ कर्मचारी आहेत- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांची माहिती नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव यांची दिल्ली येथे भेट घेतली नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेशच्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान बांगलादेशला भेट देणार काठमांडू : नेपाळ सरकारने देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली
 कल्पना चावला अन् सुनीता विलियम्स नंतर ही भारतीय महिला करणार अंतराळसफर
05-Jul-2021, 5:10:16 pm
Edited by - Pravin Wankhede
भारताची पहिली महिला अंतराळवीर  कल्पना चावला ((Astronaut Kalpana Chawla ) ही अनेकांचे प्रेरणास्थान आहे. कल्पना चावला नंतर भारतीयमुलच्या असणाऱ्या सुनीता विलियम्स ((Astronaut Sunita Williams) यांनी अंतराळात झेप(Leap into space) घेतली होती. या दोघींच्या पाठोपाठ आता आणखी एक भारतीय महिला अंतरळात झेप घेण्यास सज्ज झाली आहे.  
Abhijeet Bharat

वॉशिंग्टन: भारताची पहिली महिला अंतराळवीर  कल्पना चावला ही अनेकांचे प्रेरणास्थान आहे. कल्पना चावला नंतर भारतीयमुलच्या असणाèया सुनीता विलियम्स यांनी अंतराळात झेप घेतली होती. या दोघींच्या पाठोपाठ आता आणखी एक भारतीय महिला अंतरळात झेप घेण्यास सज्ज झाली आहे.

भारतीय वंशाची असलेली सिरीशा बांदला येत्या ११ जुलै राजी अंतराळाची सफर करणार आहे. व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रेनसन यांच्यासोबत अंतराळात जाण्यासाठी सिरीशाची निवड करण्यात आली आहे.

सिरीशा बांदला व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीत सरकारी कामकाज आणि संशोधन कार्याशी संबंधित अधिकारी आहेत. रिचर्ड यांच्यासोबत अन्य ५ जण अंतराळ प्रवासासाठी जात आहेत. सिरीशा ही धोकादायक अशा अंतराळ प्रवासाला जाणारी दुसरी भारतीय वंशाची महिला आहे. आंध्रप्रदेशातील गुंटूर हे सिरीशाचे मूळ गाव. यापूर्वी दिवंगत अंतराणवी कल्पना चावला  तराळात गेल्या होत्या, पण दुर्देवाने स्पेस शटल कोलंबियाच्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

 सिरीशा बांदला व्हर्जिन ऑर्बिटचे वॉशिंग्टन  येथील कामकाज पाहाते. या कंपनीने नुकतेच बोर्इंग ७४७ विमानाच्या मदतीने एक उपग्रह अंतराळात पाठवला होता. सिरीशाने जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे. भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी देखील अंतराळावर पाऊल ठेवले होते. ब्रेनसन यांच्या कंपनीने गुरुवारी सायंकाळी या मोहिमेची घोषणा
केली होती. ११ जुलै रोजी त्यांचे पुढील अंतराळ उड्डाण होईल आणि या सफरीत ६ जण सहभागी होतील.  हे अंतराळ यान न्यू मेक्सिको येथून उड्डाण करेल. व्हर्जिन गॅलॅक्टिकचे अंतराळातील हे चौथे उड्डाण असणार आहे. 

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.