
Image Source:(Internet)
मुंबई : अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर गोगावले यांनी बाजी मारली आहे.
१५ ऑगस्ट रोजी रायगडमध्ये भरत गोगावले यांनीच ध्वजारोहण केले होते. त्यावेळी त्यांनी रायगडचे पालकमंत्री होण्याचे संकेत दिले होते. आता त्यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा दावा खरा ठरला आहे.
दरम्यान, भरत गोगावले सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, दिल्लीतील मीना बाजार येथे पर्यटन विभागाच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. ते आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहेत.