राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

    13-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आठवडाभरात त्यांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांना फोन कॉलसोबतच ऑडिओ संदेशाद्वारेही धमकी देण्यात आली. या घटनेची माहिती त्यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, फरार आरोपी झीशान अख्तर याच्याशी या धमकीचा संबंध असल्याचा संशय आहे. अख्तर सध्या भारताबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वीही सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप होता. त्यानंतर त्यांच्या बहिणीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, नव्या धमकीनंतर तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.