सर्पदंशाच्या धक्क्यानंतर जपतलाई आश्रमशाळा रिकामी; 225 विद्यार्थ्यांना पालकांनी नेले घरी

    12-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसर हादरला आहे. या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून घरी नेले आहे.

जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेत रात्री झोपलेल्या विद्यार्थिनींना सापाने दंश केल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर काही विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. जखमींपैकी दोन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

शाळेतील उपस्थितीमध्ये मोठी घट-
घटनेनंतर पालकांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत मुलांना तातडीने घरी नेण्याचा निर्णय घेतला. शाळेत एकूण 233 विद्यार्थी असल्याचे सांगितले जात असताना, त्यापैकी सुमारे 225 विद्यार्थ्यांना पालकांनी घरी नेले आहेत. त्यामुळे शाळेत मोजकेच विद्यार्थी उरले असून परिसरात शांतता पसरली आहे.

या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वसतिगृहाची सुरक्षितता, स्वच्छता आणि सापांचा संभाव्य धोका रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा-
सर्पदंशाच्या घटनेप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक आणि महिला अधीक्षिका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा झाला का, तसेच घटनेपूर्वी आणि घटनेच्या वेळी शाळेची व्यवस्था कशी होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

याशिवाय संबंधित विभागाने चार सदस्यीय चौकशी समिती नेमली असून समितीने शाळेत पाहणी करून अहवाल सादर केल्याची माहिती आहे.

आदिवासी विकास मंत्री शाळेला भेट देणार-
या गंभीर घटनेची राज्य सरकारने दखल घेतली असून, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके जपतलाई आश्रमशाळेला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते घटनेची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीत दाम्पत्यालाही सर्पदंश-

दरम्यान, व्याहाड बुर्ज परिसरात घरात झोपलेल्या अमोल वसेकर आणि त्यांच्या पत्नी सुगंधा वसेकर यांना मण्यार सापाने दंश केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोघांनाही उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

जपतलाईतील दुर्घटनेनंतर आणि त्यानंतर समोर आलेल्या सर्पदंशाच्या घटनेमुळे गडचिरोलीतील नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Japtalai Ashram School, Snakebite scare, 225 students home, Maharashtra news
Japtalai Ashram School emptied following snakebite scare; parents took 225 students home