पाचपावलीत अवैध गोहत्या प्रकरण उघड; ९ गोवंशांची सुटका, एकाला अटक

    27-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : पाचपावली पोलिसांनी गोवंशाची अवैधरित्या कत्तल करण्याच्या तयारीत असलेल्या ठिकाणी छापा टाकत मोठी कारवाई केली. बंदेनवाज नगरातील ईटभट्टी चौक परिसरातील एका घरातून ९ गोवंशांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना गस्ती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित घरात अवैधरीत्या गोवंश ठेवून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकला. कारवाईदरम्यान शेख नसीम शेख हकीम कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले.

छाप्यात घरात ९ गोवंश अत्यंत अमानुष अवस्थेत, चारा-पाण्याविना बांधून ठेवल्याचे आढळून आले. या गोवंशांची अंदाजे किंमत सुमारे ₹२.५० लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, सर्व गोवंशांना सुरक्षितपणे धंतोली येथील गोरक्षण केंद्रात हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत.