गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; बिष्णोई गँगचा दावा, पोलिसांकडून तपास सुरू

    11-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : पंजाबी गायक गुरू रंधावा यांच्या जिमसमोर गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे दिल्लीमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी जिम परिसरात गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ संदेश व्हायरल झाला असून, त्यात लॉरेन्स बिष्णोई गँगने हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑडिओमध्ये गुरू रंधावा आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील संबंधांचा उल्लेख करून हल्ल्यामागे तेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहे. तसेच व्हायरल झालेल्या पोस्ट आणि ऑडिओची सत्यता पडताळण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात खरोखरच बिष्णोई गँगचा सहभाग आहे की त्यांच्या नावाचा वापर करून कोणीतरी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.