सोनं-चांदी झाली स्वस्त; जूनच्या पहिल्याच दिवशी दरात मोठी घसरण

    01-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मौल्यवान धातूंच्या बाजारात आलेल्या नरमाईमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि नफावसुलीमुळे दरांवर दबाव आल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर 5 ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचा दर मागील सत्रात प्रति 10 ग्रॅम 1,60,911 रुपयांवर बंद झाला होता. मात्र सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होताच सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. दर 1,59,350 रुपयांपर्यंत खाली आला, तर सकाळी सुमारे 9.55 वाजता तो 1,59,701 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता.

चांदीच्या किंमतीतही घसरण दिसून आली. एमसीएक्सवर चांदीचा दर सकाळी 2,66,540 रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला.

स्थानिक सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 820 रुपयांनी घसरून 1,56,220 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 22 कॅरेट सोन्याचा दर 750 रुपयांनी कमी होऊन 1,43,200 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 610 रुपयांनी घसरून 1,17,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. किरकोळ बाजारात चांदीचा दर सुमारे 2.80 लाख रुपये प्रति किलो आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
दिल्ली, लखनऊ आणि जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,370 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,350 रुपये आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोने 1,56,220 रुपये तर 22 कॅरेट सोने 1,43,200 रुपये दराने विकले जात आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,58,180 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 1,45,000 रुपये आहे. पटना येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,56,270 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

महाराष्ट्रात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 15,829 रुपये इतका नोंदवला गेला असून 10 ग्रॅमसाठी हा दर 1,58,290 रुपये आहे. मागील दिवसाच्या तुलनेत सुमारे 600 रुपयांची घट झाली आहे. चांदीचा दर राज्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सुमारे 2.80 लाख रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

सोने-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला असून, आगामी काही दिवसांत बाजाराची दिशा काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.