करण जोहरचा मोठा निर्णय; शाहरुख, काजोल, आलियासह अनेक सेलिब्रिटींना केलं अनफॉलो

    29-May-2026
Total Views |
ImgSource(Internet)

मुंबई :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण त्याचा चित्रपट किंवा शो नसून सोशल मीडियावरील त्याची एक मोठी कृती ठरली आहे. करणने अचानक इंस्टाग्रामवर अनेक बड्या कलाकारांना अनफॉलो केल्याने बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

करणने अनफॉलो केलेल्या कलाकारांमध्ये शाहरुख खान, काजोल, आलिया भट्ट, करीना कपूर खान तसेच त्याचा जवळचा मित्र आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचाही समावेश आहे. याशिवाय वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, मलायका अरोरा, अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन यांनाही त्याने अनफॉलो केल्याचे दिसून आले.

करणच्या इंस्टाग्रामवरील फॉलोइंग लिस्ट अचानक कमी झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना सुरुवात झाली. इंडस्ट्रीत काही वाद झाला का? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. मात्र करणने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीद्वारे यावर स्पष्टीकरण दिले आहे.

“हा माझ्या डिजिटल डिटॉक्सचा भाग आहे. सोशल मीडियावर कमी वेळ घालवण्यासाठी मी सर्वांना अनफॉलो करत आहे. कृपया याला मोठा वाद बनवू नका,” असे करणने स्पष्ट केले.

दरम्यान, करण जोहरचा नुकताच प्रदर्शित झालेला चांद मेरा दिल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. अनन्या पांडे आणि लक्ष्य लालवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 20 कोटी रुपयांची कमाई केल्याची चर्चा आहे.