
Image Source:(Internet)
नागपूर: शहरातील प्रत्येक तरुणासह खेळांडूमध्ये फिटनेस रहावे, त्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी तसेच शहरातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवावा या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात देशातील पहिल्या ग्रासरूट स्तरावरील खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक, माजी आमदार संदीप जोशी दिनांक ३१ मे ते ७ जून या दरम्यान करण्यात आले आहे. “खेलो नागपूर खेलो” या संकल्पनेवर आधारित, खासदार महोत्सवांतर्गत येत्या ३१ मे रोजी मॅरेथॉन व “रन नागपूर रन” या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून सुरू होईल. अधिकाधिक संख्येत धावपटूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
विविध गटांतर्गत शर्यतीचे आयोजन
मॅरेथॉन मध्ये पुरुषांसाठी १० किमी , महिला करिता ५ किमी तसेच १६ वर्षांखालील मुलांकरीता ५ किमी व मुलींसाठी ३ किमी व 'रन नागपूर रन' ही धावण्याची स्पर्धा ३ किमी अशा विविध गटांतर्गत शर्यतीचे आयोजित करण्यात आले आहे. ही शर्यंत सर्वांसाठी खुली राहणार आहे. प्रत्येक नोंदणीकृत स्पर्धकाला टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र आणि लंच बॉक्स दिला जाणार आहे तसेच विशेष आकर्षण म्हणजे सहभागी सर्व खेळाडू ना एक लकी ड्रा कुपन दिल्या जाणार आहे जा त्यातुन १० नंबर लकी ड्रा काढण्यात येणार आहे. नोंदणी शुल्क केवळ १० रुपये असून, स्पर्धकांनी २८ मे २०२६ पूर्वी आपल्या प्रवेशाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. इच्छुक खेळाडू शहरातील सहा प्रमुख केंद्रांवर (उत्तर, पूर्व, मध्य, पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूर) आपले प्रवेश अर्ज जमा करू शकतात. तसेच, २९ व ३० मे रोजी यशवंत स्टेडियमवर टी-शर्ट व चेस्ट नंबरचे वाटप केले जाणार आहे. स्पर्धकांनी नोंदणी पावती जपून ठेवावी, कारण लकी ड्रॉ साठी ती आवश्यक ठरणार आहे.
एकूण ३ लाख २८ हजाराचे बक्षीस
खासदार क्रीडा महोत्सवातील मॅरेथॉन स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे, एकूण ३ लाख २८ हजार रुपयांची भरघोस बक्षीस रक्कम. यासोबतच १० लकी ड्रॉ विजेत्यांना बजाज चेतक, ईव्ही मोटरसायकल, ईव्ही सायकल आणि स्पोर्ट्स शूजसारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. निरोगी आणि सशक्त नागपूर घडवण्यासाठी शहरातील तमाम क्रीडाप्रेमींनी या महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-
मॅरेथॉन - जितेंद्र घोरदडेकर -9823016521 विनोद डहारे -7709033339 पंकज करपे-9021361909
गणेश वाणी- 9922355498 अक्षय इंगळे -9373727114
रन नागपूर रन- रितेश पांडे - 8698444499 रिषभ अरखेल -7841829002 कुलदीप माटे - 9096190515
अथर्व त्रिवेदी - 9423114531 नागेश साठवणे - 9075771275