बारावीचा निकाल जाहीर; राज्यात ८९.७९% यश, नागपूर विभागाचा निकाल ८८.६७ टक्के

    02-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी (HSC) परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.१५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के आहे. त्यामुळे गुणवत्तेत मुलींचे वर्चस्व कायम राहिले आहे.

नागपूर विभागाची कामगिरी नागपूर विभागाचा निकाल यंदा ८८.६७ टक्के लागला आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा थोडा कमी असला तरी विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. नागपूर विभागात स्पर्धा कायम असल्याचे चित्र दिसून येते.

राज्यातील विविध विभागांपैकी कोकण विभागाने ९४.१४ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्क्यांवर राहिला. पुणे (९१.२५%), मुंबई (९०.०८%) आणि अमरावती (९०.९२%) या विभागांनीही उल्लेखनीय यश नोंदवले.

राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.

विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. तसेच, डिजीलॉकरवर डिजिटल मार्कशीटही उपलब्ध होणार आहे.

निकालानंतर गुण पडताळणीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.