Image Source:(Internet)
नवी दिल्ली:
सनी देओल अभिनीत बॉर्डर 2 (Border 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवत देशांतर्गत कमाईचा 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण 315.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून, दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केले आहे. हा 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘बॉर्डर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागातही सनी देओल प्रमुख भूमिकेत होते.
या चित्रपटात सनी देओल यांच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
चित्रपटाने प्रदर्शित झालेल्या पहिल्याच दिवशी 32.10 कोटी रुपये कमावले होते. तर पहिल्या आठवड्याच्या शेवटी ही कमाई 129.89 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. पहिल्या संपूर्ण आठवड्यात चित्रपटाने 244.97 कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर बॉक्स ऑफिसचे हे आकडे शेअर केले. या पोस्टसोबत चित्रपटाचा पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ने आतापर्यंत एकूण 315.10 कोटी रुपयांची कमाई केल्याने हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.