उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडसह पुण्याच्या पालकमंत्री; शासनाकडून परिपत्रक जारी!

03 Feb 2026 17:41:00
 
DCM Sunetra Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई / बीड:
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता त्यांच्या खांदी बीड आणि पुण्याच्या पालकत्वाची जबाबदारी आली आहे. प्रशासन विभागाने या संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
 
अजित दादांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवनात शपथविधी पार पडली. काही ठिकाणी शपथविधी घाईघाईने घेण्यात आल्याचा आरोप केला गेला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की, पवार कुटुंबाने तिसऱ्या दिवशी दशक्रिया विधी पूर्ण केल्यानंतर शपथविधी पार पाडली.
 
सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांना बीड जिल्ह्याचा पालकमंत्री करण्यात आले आहे, कारण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे गेली आहे.
 
राज्यातील राजकीय नेत्यांकडून आणि पवार कुटुंबाकडून सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला मान्यता मिळाली असून, त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर आणि बीड-पुण्याच्या पालकमंत्रिपदावर येणाऱ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0