अभिनेता शाहीद कपूरच्या ‘ओ रोमियो’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड!

    23-Feb-2026
Total Views |
 
O Romeo
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
ओ रोमियो (O Romeo) या चित्रपटाने अवघ्या १३ दिवसांत जागतिक स्तरावर १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वर्ल्डवाइड कलेक्शन १००.१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
 
शाहिद कपूर आणि तृप्ति डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट या बॅनरखाली करण्यात आली आहे. नामांकित निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची पकड मजबूत दिसून येत आहे. भारतात आतापर्यंत या चित्रपटाने ७६.६० कोटी रुपयांची कमाई केली असून, पुढील काही दिवसांत ही कमाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
चित्रपटात शाहीद कपूर आणि तृप्ति डिमरी यांच्यासोबत अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, दिशा पाटनी आणि विक्रांत मैसी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकत आहेत.
 
काय आहे कथानक?
मुंबईतील धोकादायक गँगस्टर ‘हसीन उस्तरा’ (शाहीद कपूर) यांच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते. त्याच्या आयुष्यात ‘अफशा’ (तृप्ति डिमरी) येताच कथेला नवे वळण मिळते. गुन्हेगारी आणि प्रेम यांच्या संघर्षात अडकलेली ही कथा प्रेक्षकांना भावनिक आणि थरारक अनुभव देण्याचा प्रयत्न करते.
 
चित्रपटाच्या वाढत्या कमाईवरून ‘ओ रोमियो’ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड येत्या काळात आणखी वेग घेण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.