Image Source:(Internet)
मुंबई :
रेल्वेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Western Railway अंतर्गत ५३४९ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Railway Recruitment Cell मार्फत केली जाणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून २३ मार्च २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे.
परीक्षा नाही; मेरिटवर निवड-
या अप्रेंटिस पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करून केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणीद्वारे अंतिम निवड होणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल.
पात्रता काय?
उमेदवार किमान १२वी उत्तीर्ण असावा.
संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
फिटर, वेल्डर, टर्नर, मॅकेनिस्ट, वायरमन, पाइप फिटर, प्लंबर, स्टेनोग्राफर आदी ट्रेडसाठी पदे उपलब्ध आहेत.
इंजिनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा धारक उमेदवारही अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा?
अधिकृत संकेतस्थळ www.rrc-wr.com वर भेट द्या.
प्रथम नोंदणी (Registration) प्रक्रिया पूर्ण करा.
आधार नोंदणीसह आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करा.
अर्जाची प्रिंटआउट भविष्यासाठी जतन करून ठेवा. सरकारी विभागात करिअरची सुरुवात करण्यासाठी ही उत्तम संधी मानली जात आहे. रेल्वे क्षेत्रात प्रत्यक्ष काम शिकत अनुभव मिळवण्याची संधी या भरतीमुळे तरुणांना उपलब्ध होणार आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.