Image Source:(Internet)
मुंबई :
सराफा बाजारात आज सोन्याच्या (Gold) दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल २,९०३ रुपयांनी घसरत १,५१,१९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. हा दर सोन्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा २४,९२६ रुपये म्हणजेच जवळपास २५ हजार रुपयांनी कमी आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याची किंमत आज १,५५,७३० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे.
सोमवारी २४ कॅरेट (९९९ शुद्धता) सोनं जीएसटीशिवाय १,५४,०९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. हे दर Indian Bullion and Jewellers Association (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आले असून संस्था दिवसातून दोन वेळा अधिकृत दर प्रसिद्ध करते.
२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर-
२२ कॅरेट सोन्याच्या दरात २,६५९ रुपयांची घसरण होऊन तो १,३८,४९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर १,४२,६४९ रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही २,१७८ रुपयांची कपात झाली आहे. आज १८ कॅरेट सोनं १,१३,३९६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं असून जीएसटीसह त्याची किंमत १,१६,७९७ रुपये झाली आहे.
१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे दर-
१४ कॅरेट सोन्याचा दर १,६९८ रुपयांनी घसरून ८८,४४९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. जीएसटीसह हा दर ९१,१०२ रुपये इतका आहे.
दरम्यान, २३ कॅरेट सोन्याच्या दरात मात्र २,८९१ रुपयांची वाढ झाली असून तो १,५०,५९० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला आहे. जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत १,५५,१०७ रुपये इतकी झाली आहे.
सोन्याच्या दरातील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. आगामी लग्नसराईच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.