कॉर्पोरेट टॅक्स भरण्यात 'हा' समूह अव्वल स्थानी ; टॉप १० कंपन्यांची यादी जाहीर

    16-Feb-2026
Total Views |
 
corporate tax payment
 Image Source:(Internet)
मुंबई :
देशातील मोठ्या उद्योगसमूहांकडून सरकारला मिळणाऱ्या महसुलात कॉर्पोरेट टॅक्सचा (Corporate tax) मोठा वाटा आहे. कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक नफ्यावर भरलेला हा कर देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. ‘हुरुन इंडिया २०२४’च्या अहवालानुसार, यंदा सर्वाधिक कॉर्पोरेट टॅक्स भरण्याचा मान Reliance Industries या कंपनीने पटकावला आहे.
 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल २५,७०७ कोटी रुपये कर स्वरूपात सरकारकडे जमा केले. ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, किरकोळ विक्री आणि दूरसंचार या विविध क्षेत्रांतील भक्कम व्यवसायामुळे कंपनीने मोठा नफा कमावला आणि त्यावर हा कर अदा केला.
 
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Tata Consultancy Services (टीसीएस) दुसऱ्या क्रमांकावर असून तिने १५,८९८ कोटी रुपये कॉर्पोरेट टॅक्स भरला आहे. तर खनिज क्षेत्रातील Vedanta Limited ही कंपनी तिसऱ्या स्थानावर असून उद्योगपती अनिल अग्रवाल Agarwal यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीने सुमारे १२,८२६ कोटी रुपये अदा केला आहे.
 
याशिवाय HDFC Bank, Infosys, Kotak Mahindra Bank, Bajaj Finance, ITC Limited, HCL Technologies आणि Larsen & Toubro या कंपन्यांचाही अव्वल दहामध्ये समावेश आहे.
 
या यादीवरून स्पष्ट होते की ऊर्जा, आयटी, बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या देशाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर कर जमा करत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, कॉर्पोरेट टॅक्स भरण्यात रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.