परभणीत मुस्लिम महापौर निवडीवरून वाद; भाजपची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

    13-Feb-2026
Total Views |
 
Uddhav Thackeray
 Image Source:(Internet)
मुंबई:
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणांमध्ये परभणी महापालिकेतील महापौर निवडीवरून नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. परभणीत (Parbhani) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने एकत्र येत महापौरपदाची निवडणूक लढवली आणि शिवसेना (यूबीटी) चे नगरसेवक सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड झाली. या निर्णयावरून भाजपने शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
 
६५ सदस्यीय परभणी महानगरपालिकेत शिवसेना (यूबीटी) २५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसला १२ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सय्यद इक्बाल यांनी भाजपचे उमेदवार तिरुमल खिलारे यांचा १२ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी निवडून आले.
 
चंद्रपूर महापौर निवडणुकीतून निर्माण झालेल्या मतभेदांनंतरही परभणीत महाविकास आघाडीचे घटक एकत्र आल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेना (यूबीटी) वर हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेल्याचा आरोप केला. पक्षाच्या प्रवक्त्यांनी मराठी हिंदू उमेदवाराला संधी न देता मुस्लिम नगरसेवकाची निवड केल्याचा मुद्दा उपस्थित केला.
 
यावर प्रतिक्रिया देतानखासदार संजय राऊत यांनी धर्माच्या आधारे महापौरपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचे म्हटले. त्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांची उदाहरणे देत पदासाठी पात्रता महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही हा निर्णय बहुमताच्या आधारे आणि आघाडी धर्म पाळून घेतल्याचे स्पष्ट केले.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याचा आरोप केला. परभणीतील या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून पुढील काळात या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत