केरळमध्ये घडला ऐतिहासिक क्षण; दृष्टिहीन तरुणी न्यायाधीशपदी विराजमान होणार

    10-Feb-2026
Total Views |
 
A blind young woman
 Image Source:(Internet)
केरळ:
केरळ (Kerala) राज्याच्या न्यायव्यवस्थेत एक नवा अध्याय लिहिला जात आहे. २४ वर्षीय थन्या नाथन सी., या पूर्णतः दृष्टिहीन तरुणीने आपल्या अपार जिद्दीच्या जोरावर न्यायाधीशपद मिळवले असून, त्या राज्यातील पहिल्या पूर्णतः दृष्टिहीन महिला न्यायाधीश ठरणार आहेत.
 
दृष्टी नसणे ही मर्यादा न मानता थन्या यांनी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. ब्रेल लिपीतील कायदेविषयक पुस्तके, संगणकावरील ऑडिओ साधने यांचा आधार घेत त्यांनी कन्नूर विद्यापीठातून एलएलबीची पदवी संपादन केली.
 
कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तलिपारंबा येथे ज्येष्ठ वकील के. जी. सुनीलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी वकील म्हणून काम करत न्यायालयीन प्रक्रियेचा सखोल अनुभव घेतला. पुढे त्यांनी केरळ न्यायिक सेवा परीक्षा दिली आणि या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
 
लवकरच थन्या नाथन न्यायालयात न्यायाधीश म्हणून आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्यांचा संघर्षमय प्रवास समाजातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कठीण परिस्थितीतही स्वप्नांवर विश्वास ठेवला तर यश नक्की मिळते, हे त्यांच्या यशातून स्पष्ट होते.