Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी 2026) संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 (Union Budget 2026)-27 सादर केला. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी गरीबी निर्मूलन, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढ आणि ‘विकसित भारत’ या उद्दिष्टांवर सरकारची ठाम भूमिका स्पष्ट केली. जीएसटी सुलभीकरण, पायाभूत सुविधा, आरोग्य-शिक्षण, महिला विकास आणि पर्यटन क्षेत्राला विशेष चालना देण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काही वस्तू महागल्या असल्या, तरी आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगार क्षेत्राला दिलासा देणारे निर्णयही जाहीर झाले आहेत.
काय महाग झालं?
तंबाखू व सिगारेटच्या किमतींमध्ये वाढ
पानमसाल्यावर स्वतंत्र उपकर लागू
काय स्वस्त झालं?
-कॅन्सर आणि मधुमेहावरील औषधांवरील कर कमी; -औषधं स्वस्त होण्याची शक्यता
-शेती, पर्यावरण आणि मत्स्यव्यवसाय
-कर्नाटक व केरळमध्ये कासवांच्या घरट्यांच्या संवर्धनासाठी विशेष योजना-
-चंदन उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन
-देशभरात मत्ससंवर्धनासाठी 500 ‘अमृत जलाशय’
किनारी भागात नारळ, चंदन व काजू उत्पादनाला चालना
शिक्षण आणि रोजगार-
-शिक्षणातून थेट रोजगार निर्मितीसाठी उच्चस्तरीय समित्यांची स्थापना
-पूर्व भारतात राष्ट्रीय डिझाईन संस्थेची घोषणा
-प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृह उभारण्याचा निर्णय
आरोग्य सेवा-
-सरकारी व खासगी क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टरांची निर्मिती
-3 नवे ऑल इंडिया आयुर्वेद संस्थान
-देशातील 5 ठिकाणी मेडिकल हब विकसित होणार
रेल्वे आणि वाहतूक-
7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा, त्यात प्रमुख मार्ग:
मुंबई–पुणे
पुणे–हैदराबाद
हैदराबाद–बंगळुरू
दिल्ली–वाराणसी
वाराणसी–सिलिगुडी
पायाभूत सुविधा-
-5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या पायाभूत सुविधांचा विकास
-आत्मनिर्भर भारतासाठी 2 हजार कोटींची तरतूद
-पुढील 5 वर्षांत 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग
महिला व ग्रामीण विकास-
-ग्रामीण महिलांसाठी ‘SHE-MART’ उपक्रम
-‘खेळो इंडिया’ मिशनची सुरुवात
-15 पुरातत्त्वीय स्थळांचा विकास
-अर्थव्यवस्था आणि राज्यांना निधी
भारताची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा-
-2027 मध्ये राज्यांना 1.4 लाख कोटी रुपयांचे अनुदान वितरण
पर्यटन-
-मेडिकल टुरिझमसाठी नवी धोरणे
-पहिली जागतिक व्याघ्र परिषद भारतात
जागतिक दर्जाची ट्रेकिंग स्थळे विकसित करण्याचा मानस-
-ईशान्य भारतात बौद्ध सर्किट विकसित करण्याची योजना
दरम्यान एकूणच, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, पर्यटन आणि आत्मनिर्भर भारतावर ठोस भर देण्यात आला आहे. काही वस्तू महाग झाल्या असल्या, तरी विकासाभिमुख आणि रोजगारकेंद्रित घोषणांमुळे विविध क्षेत्रांना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.