नागपूर सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याचा इशारा; धमकीच्या ई-मेलने पोलिसांची तारांबळ!

    26-Nov-2026
Total Views |
न्यायालय परिसरात बॉम्बशोधक पथकाची तपासणी मोहीम; सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा अलर्ट

Image Source:(Internet)

नागपूर :
नागपूर सत्र न्यायालयाला लक्ष्य करत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने न्यायालयीन वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात व्यक्तीकडून ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनी तातडीने खबरदारीची पावले उचलली.

धमकीची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथकाला न्यायालयात बोलावण्यात आले. न्यायालयाच्या इमारतीसह परिसरातील विविध भागांची तपासणी करण्यात येत असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळते का, याची पडताळणी केली जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या धमकीमागील व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. ई-मेलचा स्रोत शोधण्यासह धमकीच्या सत्यतेची तपासणी केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क ठेवण्यात आली आहे.