बाळासाहेबांच्या छायाचित्राच्या विटंबनेवरून वाद; शायना एनसी यांनी माफी मागावी, अवधेश शुक्लांची मागणी

    18-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची पाने फाडल्याच्या कथित प्रकारावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रवक्ते अवधेश शुक्ला यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शायना एनसी यांनी महाराष्ट्रासह देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.

या घटनेवेळी उपस्थित असलेल्या संजय निरुपम यांच्यावरही शुक्ला यांनी टीका केली. शायना एनसी, संजय निरुपम, मनीषा कायंदे आणि आनंद दुबे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.