चंद्रपुरात काँग्रेसचे ‘वोट बचाओ–देश बचाओ’ आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

    09-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार ‘लोकतंत्र बचाओ सप्ताह’ अंतर्गत गुरुवारी चंद्रपुरात काँग्रेसच्या वतीने ‘वोट बचाओ–देश बचाओ’ जनआंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले. मतदारांचे अधिकार सुरक्षित ठेवणे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करणे आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यांवर काँग्रेस सातत्याने आवाज उठवत राहील, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.

आंदोलनाच्या शेवटी जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यात आले.