नागपुरात दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    27-Oct-2026
Total Views |
 
Earthquake
Image Source:(Internet)
 
नागपूर : उपराजधानी नागपूर आणि आसपासच्या परिसरात आज दुपारी भूकंपाचे Earthquake सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जमीन हादरल्याची जाणीव झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.० असल्याचे सांगितले जात असून, भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे ८ किलोमीटर खोलीवर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
मात्र, भूकंपाची तीव्रता, केंद्र आणि खोली याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तसेच या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
 
भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्तामुळे नागपूरकरांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली. या घटनेबाबत अधिकृत यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतरच भूकंपाची नेमकी तीव्रता आणि केंद्र स्पष्ट होणार आहे.