Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले असताना मतमोजणीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी Abhijit Wanjari यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीअखेर वंजारी यांना 28 हजार 536 मते मिळाली असून, भाजपचे सुधाकर कोहळे यांना 27 हजार 751 मते प्राप्त झाली आहेत. त्यामुळे वंजारी 785 मतांनी पुढे आहेत. नितेश कराडे यांना 14 हजार 243 मते मिळाली आहेत.
84 हजार मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या या आकडेवारीमुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. वंजारी यांची आघाडी कायम राहणार की उर्वरित मतमोजणीत कोहळे पिछाडी भरून काढणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
या निवडणुकीत नितेश कराडे यांना मिळालेल्या मतांमुळेही प्रमुख उमेदवारांच्या विजयाची समीकरणे महत्त्वाची ठरत आहेत. दरम्यान, उपलब्ध आकडेवारी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नसल्याने अंतिम निकालासाठी निवडणूक विभागाच्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.