अजित पवार पंचतत्त्वात विलीन; ‘दादा’च्या अखेरच्या प्रवासाला निरोप

29 Jan 2026 13:13:40
 
Ajit Pawar
 Image Source:(Internet)
बारामती :
ठाम भूमिका, शिस्तप्रिय कार्यशैली आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
गुरुवारी, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘दादा’च्या अखेरच्या दर्शनासाठी परिसरात भावनिक आणि शोकमय वातावरण निर्माण झाले होते.
 
अश्रूंच्या साक्षीने अंत्यविधी
अंत्यविधीच्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हस्ते अंत्यसंस्कार पार पडले. देशभरातून आलेल्या मान्यवरांनी आणि असंख्य समर्थकांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाला आणि कार्याला श्रद्धांजली वाहिली.
 
विकासकेंद्री राजकारण, निर्णयक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांशी थेट नाते जपणारा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
 
Powered By Sangraha 9.0