बारामतीत मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंची सुनेत्रा पवार यांची घेतली भेट

28 Jan 2026 17:24:14
 
Sunetra Pawar
 Image Source:(Internet)
बारामती:
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अचानक निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बारामती येथे जाऊन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी पवार कुटुंबीयांप्रती आपले दु:ख व्यक्त करत त्यांना धीर दिला.
 
या भेटीचे छायाचित्र समोर आले असून, त्या छायाचित्रात मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे गंभीर वातावरणात सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण होते.
 
अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
या दु:खद प्रसंगी राज्यातील अनेक नेते, अधिकारी आणि कार्यकर्ते पवार कुटुंबाच्या भेटीसाठी बारामतीत दाखल होत असून, त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश देत आहेत.
Powered By Sangraha 9.0