राज्याच्या राजकारणात खळबळ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

28 Jan 2026 10:42:51
 
Ajit Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई :
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात त्यांच्या चार्टर्ड विमानाच्या लँडिंगदरम्यान झाल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
दाव्यानुसार, मुंबईहून बारामतीकडे येत असलेले चार्टर्ड विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर संतुलन बिघडल्याने रनवेवरून घसरले आणि अपघातग्रस्त झाले. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
 
नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA) कडून अपघाताची पुष्टी करण्यात आल्या आहे.
 
विमानात प्रवास करणारे सर्वजण ठार झाल्याचा उल्लेख केला जात आहे. तसेच अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे किरण गुजर यांनी बारामतीतील रुग्णालयात सर्वांना मृतावस्थेत आणल्याचा दावा देखील प्रसारित होत आहे.
 
अजित पवार हे बारामतीत होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी मुंबईहून रवाना झाले होते.
 
दरम्यान, बारामती विमानतळ प्रशासनाकडून अपघातग्रस्त विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK असून ते Learjet-45 प्रकारचे विमान असल्याचा समोर येत आहे.
Powered By Sangraha 9.0