डिजिटल युगातील आव्हानांवर मात करण्यासाठी 'यूसीएमएएस' ठरत आहे प्रभावी माध्यम

21 Jan 2026 14:48:27
डिजिटल सोयींमुळे एकाग्रतेवर परिणाम, यूसीएमएएस देतो बौद्धिक बळ

UCMAS Nagpur 
नागपूर |
आजचे युग पूर्णपणे डिजिटल (Digital) झाले असून, शिक्षण, खेळ आणि करमणुकीच्या सुविधा मुलांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुलांना पूर्वीप्रमाणे जास्त मेहनत किंवा खोल एकाग्रतेची गरज भासत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या एकाग्रता, स्मरणशक्ती आणि विचारक्षमतेवर होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर राबविण्यात येणारा बालविकास कार्यक्रम यूसीएमएएस (UCMAS – Universal Concept of Mental Arithmetic System) हा एक प्रभावी उपाय ठरत आहे. ५ ते १३ वयोगटातील मुलांसाठी विकसित करण्यात आलेला हा कार्यक्रम मेंदूच्या दोन्ही भागांचा समतोल विकास साधत मुलांची ब्रेन पॉवर, मेमरी, कॉन्सन्ट्रेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स मजबूत करण्यास मदत करतो. डिजिटल युगातील विचलनांमध्येही मुलांना जलद, अचूक आणि आत्मविश्वासाने विचार करण्यास हा कार्यक्रम सक्षम बनवत आहे.

नागपुरात यूसीएमएएस तंत्रज्ञानाचे थक्क करणारे सादरीकरण
रविवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या महर्षी व्यास सभागृहात यूसीएमएएस तंत्रज्ञानाची प्रभावी झलक पाहायला मिळाली. येथे ५ ते १३ वयोगटातील मुलांनी काही मिनिटांतच जवळपास २०० गणिती प्रश्न सोडवून उपस्थित प्रेक्षक व पालकांना थक्क केले. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि टाळ्यांच्या गजरात त्यांनी मुलांचे मनोबल उंचावले. ही स्पर्धा यूसीएमएएसची १४ वी नागपूर रिजन स्टेट लेव्हल स्पर्धा होती, जी कोविडनंतर प्रथमच आयोजित करण्यात आली. राज्यातील विविध शहरांमधून १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. व्हिज्युअल, लिसनिंग आणि फ्लॅश या तीन प्रकारांत झालेल्या स्पर्धेत मुलांनी अबॅकस तंत्राच्या मदतीने वेगवान व अचूक गणिती गणना सादर केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आठ स्तर पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन समारंभ आणि बक्षीस वितरणही पार पडले.
 
एनईपीशी सुसंगत उपक्रम, पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद
या प्रसंगी छत्तीसगड राज्य आणि नागपूर रिजनचे सीईओ दिलीप जैन यांनी सांगितले की, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) रटाळ पाठांतराऐवजी समजून शिकणे आणि मुलांना कौशल्याधारित बनवण्यावर भर देत आहे, त्याच दिशेने यूसीएमएएस प्रभावीपणे कार्य करत आहे. “येथे सहभागी झालेल्या मुलांचे उत्कृष्ट प्रदर्शन या संकल्पनेच्या यशाचे द्योतक आहे,” असे ते म्हणाले. यूसीएमएएस इंडिया हेड सिम्प्लिसियो मेनेज यांनी ‘सिक्स फिंगर टेक्निक’चे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, या तंत्रामुळे गणित सोपे आणि रंजक होते, तसेच मुलांची व्हिज्युअलायझेशन, ऐकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता लक्षणीयरीत्या वाढते. पालकांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले. तेजस्विनी सावरबांधे यांनी याला “प्रभावी आणि उत्कृष्ट संकल्पना” म्हटले, तर प्रेमकुमार मेश्राम यांनी राज्यभरातील मुलांमधील हेल्दी स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढत असल्याचे सांगितले. डिजिटल युगात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी यूसीएमएएस हा एक मजबूत आणि सकारात्मक टप्पा ठरत आहे
 
यांची उपस्थिति होती
डॉ. नंदलाल लक्ष्मण चौधरी रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल, नागपूरच संचालक, डॉ. संदीप बी. सराटकर- विद्यासाधना कॉन्व्हेंट आणि ज्युनियरचे संचालक. कॉलेज/वंडरकिड्स स्कूल, डॉ. अशोक भुतडा सहाय्यक आयुक्त, गांधी सरस्वती स्कूल मोरेगाव अर्जुनी, सचिन चौधरी सावनेर; या कार्यक्रमास अतिथी म्हणून डॉ.प्रशांत कडू-डीपीआयएस उमरेड, डॉ.पुष्पा उदासी नागपूर, राजेया सुलताना एमएसबी शिक्षण संस्था नागपूर उपस्थित होते. UCMAS इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख डॉ स्नेहल कारिया यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या आहेत. Ucmas इंडियाचे बिझनेस हेड श्री सिम्प्लिसिओ मिनेझिस यांनी त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा दिली.
Powered By Sangraha 9.0