केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम २५ जानेवारीला

21 Jan 2026 23:05:39
 
Nitin Gadkari
 Image Source:(Internet)
नागपूर :
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
 
खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेजवळ असलेल्या मंत्री महोदयांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कालावधीत मंत्री गडकरी नागरिकांची निवेदने स्वीकारणार असून, नागरिकांना वैयक्तिक भेट देऊन संवाद साधणार आहेत.
 
नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी व मागण्या लेखी स्वरूपात आणि आवश्यक कागदपत्रांसह आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त होणाऱ्या निवेदनांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
 
त्यानंतर दुपारी १ ते २ या वेळेत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भेट घेणार आहेत.
 
या जनसंपर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर शहर व परिसरातील नागरिकांना आपल्या समस्या थेट मंत्री महोदयांपर्यंत मांडण्याची संधी मिळणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0