रेल्वेतील सर्वात मोठी भरती;ग्रुप ‘डी’साठी २२ हजार जागा,अर्जाची तारीख पुढे ढकलली

21 Jan 2026 23:08:35
 
Railways
 Image Source:(Internet)
नागपूर :
रेल्वेत (Railway) नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत ग्रुप ‘डी’ पदांसाठी जाहीर करण्यात आलेली भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल २२,००० रिक्त पदे भरली जाणार आहेत
 
आरआरबीने २७ डिसेंबर रोजी ग्रुप ‘डी’ भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार अर्जप्रक्रिया २१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार होती. मात्र, आता ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती आरआरबीने अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.
 
नवीन अर्ज वेळापत्रक-
ग्रुप ‘डी’ पदांसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून २ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील-
 
या भरतीत विविध विभागांमध्ये पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये—
इंजिनिअरिंग विभाग : १२,५०० पदे
ट्रॅक मेंटेनर ग्रेड-४ : ११,००० पदे
ट्रॅफिक पॉईंट्समन ‘बी’ : ५,००० पदे
असिस्टंट (S&T) : १,५०० पदे
असिस्टंट (C&W) : १,००० पदे
असिस्टंट ऑपरेशन्स : ५०० पदे
असिस्टंट लोको शेड : २०० पदे
 
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा-
ग्रुप ‘डी’ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून ITI केलेले असणे गरजेचे आहे.
उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
 
निवड प्रक्रिया व वेतन
उमेदवारांची निवड CBT (कम्प्युटर बेस्ड टेस्ट) द्वारे केली जाणार असून त्यानंतर शारीरिक चाचणी (Physical Test) घेतली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १८,००० रुपये बेसिक वेतन मिळणार आहे.
 
रेल्वेतील या मेगाभरतीमुळे लाखो तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन आरआरबीकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0