नागपूर मनपाची मतमोजणी आज; ३८ प्रभागांतील ९९३ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय

16 Jan 2026 12:32:07
 
Nagpur Municipal Corporation
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर (Nagpur) महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर आज मतमोजणीचा महत्त्वाचा दिवस उजाडला आहे. सकाळी १० वाजतापासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होणार असून, ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे.
 
निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण ३,५७९ कर्मचाऱ्यांची केंद्राध्यक्ष म्हणून, तर १०,७३७ कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील ३८ प्रभागांमधून निवडणूक रिंगणात असलेल्या तब्बल ९९३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतमोजणीतून ठरणार आहे.
 
लकडगंज प्रभागातील मतमोजणी केंद्रासह शहरातील सर्व केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक साधनसामग्री आणि मनुष्यबळाचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.
 
दरम्यान, मतमोजणीच्या निकालाकडे संपूर्ण नागपूर शहरासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नागपूर महानगरपालिकेची सत्ता कुणाच्या हाती जाणार, याचे चित्र आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0