Image Source:(Internet)
नागपूर :
प्रभाग क्रमांक २८ मधील आराधना नगर परिसरातील जीआरके कॉन्व्हेंट येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. सकाळी मतदान सुरू होण्याच्या वेळेतच मशीनमध्ये दोष आढळून आल्याने मतदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली.
या बिघाडामुळे सुमारे ४० मिनिटे मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सदोष ईव्हीएम मशीन बदलून नवीन मशीन बसवली. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली.
अल्पकाळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असली तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या मतदान शांततेत सुरू असून मतदार मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत आहेत.