दुबार मतदानावर राज ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’ला मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

15 Jan 2026 14:53:32
 
FadnavisRaj
 Image Source:(Internet)
मुंबई:
महानगरपालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे (Thackeray) पक्षांनी दुबार मतदान टाळण्यासाठी ‘भगवा गार्ड’ या नावाखाली आपले कार्यकर्ते मतदान केंद्रांबाहेर तैनात केले आहेत. राज ठाकरेंनी दुबार मतदान करणाऱ्यांना ठोका देण्याचे आदेश दिले, मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत विरोध व्यक्त केला आहे.
 
फडणवीस यांनी सांगितले की, “मुंबईत कुणालाही दहशत निर्माण करण्याची मुभा नाही. जर कोणी असे प्रयत्न केले तर पोलिस त्यांच्यावर कडक कारवाई करतील.” तसेच त्यांनी दुबार मतदान संशोधनाच्या प्रक्रियेचे समर्थन करत, मतदान केंद्रावर पक्षांचे एजंट आक्षेप घेऊ शकतात, पण मारामारी आणि दहशतवादाला चालना देणे ही चुकीची वळण आहे.
 
नागपूरमध्ये भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, “काँग्रेसने अनेक गुंडांना उमेदवारी दिली आहे. अशा गुंडांकडून आमच्या कार्यकर्त्यांवर हिंसा करण्यात आली आहे. पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, त्याची चौकशी केली जाणार आहे.”
 
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यात कोणत्याही प्रकारच्या राजकीय दहशतीला मनाई केली जाईल आणि निवडणूक सुरक्षित, शांततेत पार पडण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
Powered By Sangraha 9.0