(Image Source-Internet)
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात, आनंद आणि उत्साहात साजरा झाला. दहा दिवस चाललेल्या या उत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) आधीच पार पडले असून आता दहा-अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे.
यंदा अनंत चतुर्दशी शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी साजरी होत आहे. या दिवशीच मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन करण्यात येणार असून, यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे हे भक्तांमध्ये उत्सुकतेचे कारण ठरले आहे.
अनंत चतुर्दशीची तिथी
सुरुवात: ६ सप्टेंबर २०२५, पहाटे ३.१२ वाजता
समाप्ती: ७ सप्टेंबर २०२५, मध्यरात्री १.१२ वाजता
विसर्जनाचे शुभ मुहूर्त
सकाळचा शुभ मुहूर्त: सकाळी ७.३६ ते ९.१०
दुपार ते संध्याकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत): दुपारी १२.१९ ते संध्याकाळी ५.०२
सायंकाळचा मुहूर्त (लाभ): संध्याकाळी ६.३२ ते रात्री ८.०२
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चर): रात्री ९.२८ ते पहाटे १.४५
उषःकालीन मुहूर्त (लाभ): ७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३६ ते सकाळी ६.०२
भक्तगणांनी यापैकी आपल्या सोयीचा आणि श्रद्धेनुसार वेळ निवडून बाप्पाचे विसर्जन करावे. भाव, भक्ती आणि श्रद्धेने केलेले विसर्जन नेहमीच मंगलमय मानले जाते.