(Image Source-Internet)
अनंत चतुर्दशी म्हणजे गणरायाच्या निरोपाचा दिवस. दहा दिवस भक्तांनी बाप्पाची आराधना केली, मनसोक्त आनंद साजरा केला. मात्र विसर्जनाच्या वेळी काही चुका घडल्यास भक्तिभावावर परिणाम होतो, असे शास्त्र सांगते. त्यामुळे या दिवशी काही नियम पाळणे आवश्यक आहे.
विसर्जनाआधी करावयाच्या गोष्टी-
घरात किंवा मंडळात शेवटची पूजा करून फळ, फुलं, नैवेद्य अर्पण करावे.
निरोप घेताना चुकांची क्षमा मागून पुढील वर्षासाठी शुभाशिर्वाद मागावेत.
विसर्जनावेळी पाळायचे नियम-
मूर्ती बाहेर नेताना मुख घराकडे, तर पाठ बाहेरच्या दिशेला ठेवावी.
मूर्तीला घराभोवती प्रदक्षिणा घालून आशीर्वाद घ्यावा.
विसर्जन घाईघाईत करू नये; शेवटची आरती करून शांततेत मूर्ती पाण्यात सोडावी.
मूर्ती थेट पाण्यात न टाकता हळूहळू विसर्जित करावी.
काय टाळावे?
मूर्तीला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी; ती अशुभ मानली जाते.
उरलेली पूजा सामग्री इथे-तिथे टाकू नये; ती झाडाखाली ठेवावी किंवा मातीत पुरावी.
विसर्जनावेळी गोंधळ, आरडाओरडा टाळावा. शिस्तबद्ध व भक्तिभावाने बाप्पाला निरोप द्यावा.