पॅनिक अटॅक;लक्षणे कशी ओळखावीत आणि त्वरित काय करावे?

04 Sep 2025 19:46:46
 
Panic Attack
 (Image Source-Internet)
 
पॅनिक अटॅक (Panic Attack) म्हणजे अचानक आलेला तीव्र भीतीचा झटका. प्रत्यक्षात धोका नसतानाही शरीर आणि मनावर एकदम भीतीचा ताण येतो. अशावेळी हृदय जोराने धडधडायला लागतं, श्वास घेणं कठीण होतं, छातीत दडपण येतं आणि व्यक्तीला वाटू लागतं की काहीतरी गंभीर घडणार आहे. त्यामुळे ही अवस्था अनुभवणाऱ्याला मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर त्रासदायक ठरते.
योग्य वेळी लक्षणे ओळखली तर परिस्थिती नियंत्रित करणे सोपे होते. विशेषतः गर्दीत अशा वेळी आजूबाजूचे लोक शांततेने मदत करू शकले तर रुग्णाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो.
पॅनिक अटॅकची शारीरिक लक्षणे-
अचानक तीव्र घबराट किंवा बेचैनी जाणवणे
हृदयाचे ठोके वेगाने वाढणे
जोराचा घाम येणे
चक्कर येणे, हात थरथरणे
छातीत दडपण किंवा वेदना जाणवणे
वर्तणुकीतील लक्षणे-
अचानक बोलणे थांबवणे
डोळ्यांचा संपर्क टाळणे
स्वतःबद्दल अनोळखी किंवा अलगद वाटणे
वास्तवापासून तुटल्यासारखं वाटणे
 
पॅनिक अटॅक आल्यास काय करावे?
जर दुसऱ्याला आला असेल तर:
घाबरू नका, शांत राहा
त्याला वेढा घालू नका, पुरेशी जागा द्या
हळूहळू दीर्घ श्वास घेण्यास प्रोत्साहित करा
त्याच्या जवळ राहून आधार द्या
 
जर तुम्हालाच आला असेल तर:
लक्षात ठेवा की ही लक्षणे काही मिनिटांत कमी होतात
पाच गोष्टी ओळखणे, पायाखालची जमीन जाणवणे यासारखे ग्राउंडिंग तंत्र वापरा
सुरक्षित जागा निवडा आणि काही वेळ शांत बसा
 
महत्वाचं काय?
पॅनिक अटॅक भीतीदायक असला तरी जीवघेणा नसतो. योग्य वेळी ओळख आणि शांतपणे प्रतिसाद दिल्यास त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. जागरूकता, संवेदनशीलता आणि आधार हेच यावरचे खरे उपचार आहेत.
Powered By Sangraha 9.0