(Image Source-Internet)
मुंबई:
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उद्या तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही.
नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील माजी मुख्यमंत्री असून त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि नंतर भाजप अशा प्रवासातून राजकीय कारकीर्द घडवली आहे. ते काही काळ केंद्रीय मंत्रीपदावरही कार्यरत होते. त्यांचे पुत्र नितेश आणि निलेश राणे राजकारणात सक्रिय असून, नितेश राणे सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत.
उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावरील तीव्र टीका आणि फटकळ भाषेसाठी नारायण राणे कायम चर्चेत राहिले आहेत. मात्र आता त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रियेची तयारी करण्यात येत आहे.