परळी रेल्वे स्थानकावर सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार;पोलिसांकडून आरोपीला बेड्या

03 Sep 2025 17:09:08
 
Six year old girl raped
(Image Source-Internet)  
बीड :
परळी (Parli) रेल्वे स्थानकावर सहा वर्षीय निरागस बालिकेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपीला जेरबंद केले.
 
माहितीनुसार, पंढरपूर येथून आलेले एक कुटुंब परळीत आल्यानंतर दुपारचे जेवण करून रेल्वे स्थानकावर विसावले होते. त्यावेळी कुटुंब झोपलेले असताना एका नराधमाने मुलीला उचलून नेले आणि उड्डाणपुलाजवळ नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार करून पसार झाला.
 
अत्याचारानंतर चिमुकलीच्या आक्रोशाने परिसरातील लोक धावून आले. तिच्या प्रकृतीची गंभीर अवस्था पाहून तात्काळ पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बालिकेला तातडीने परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी मुलीचे आईवडीलही उपस्थित होते.
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि अवघ्या पाच तासांत त्याला बेड्या ठोकल्या.सध्या आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Powered By Sangraha 9.0