Image Source:(Internet)
नागपूर :
सप्टेंबर महिना संपत आला असून, सोनं (Gold) -चांदीच्या बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. या महिन्यात गुंतवणूकदारांना दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये भरघोस परतावा मिळाल्याचं चित्र आहे.
सोने-चांदीत विक्रमी वाढ-
सोन्याने सप्टेंबरमध्येच १० टक्क्यांहून अधिक झेप घेतली, तर चांदीने तब्बल १८ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. दिवाळीला अवघे काही दिवस उरले असताना, सोनं १.२५ लाख आणि चांदी १.५० लाखांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचणार का? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.
महिनाभरात किती वाढ?
३१ ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव १,०३,८२४ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तो आता १०,८०३ रुपयांनी वाढून गुंतवणूकदारांना तब्बल १०.४०% परतावा देतोय. चांदीचा भाव ऑगस्टअखेर १,२१,८७३ रुपये किलो होता, तो तब्बल २२,०९५ रुपयांनी उसळला असून १८.१३% परतावा मिळालेला आहे.
तज्ज्ञांची भाकिते-
IIFL सिक्युरिटीजचे वेल्थ डायरेक्टर अनुज गुप्ता यांच्या मते, ‘‘दिवाळीपर्यंत सोनं १.२५ लाख आणि चांदी १.५० लाखांच्या घरात दिसू शकते. भू-राजकीय तणाव, व्यापारातील अनिश्चितता आणि सेंट्रल बँकांची सततची खरेदी यामुळे या धातूंचा कल वरच राहणार आहे.’’
JM फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रणव मेर यांनी इशारा दिला की, ‘‘काही दिवसांत नफा वसुली होऊ शकते, मात्र एकूणच तेजी कायम राहील. तर Smallcase चे पंकज सिंह यांनी म्हटलं, ‘‘ही उसळी अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी, जागतिक रिझर्व्ह बँकांची खरेदी आणि देशांतर्गत मागणी यांच्या एकत्रित परिणामामुळे आली आहे.