Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील महिलांसाठी सरकारने मोठी योजना आणली आहे. या योजनेमुळे घरबसल्या महिलांना दरमहा मानधन मिळणार असून पहिल्याच वर्षी थेट ८४ हजार रुपये वार्षिक मदत मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘विमा सखी योजना २०२५’ ची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. ही योजना एलआयसीसारख्या पद्धतीवर चालणार असून महिलांना रोजगार आणि आर्थिक आधार मिळणार आहे.
पहिल्या वर्षी दरमहा ७ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ६ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५ हजार रुपये अशा स्वरूपात मानधन मिळेल. याशिवाय, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना वर्षाखेरीस ४८ हजार रुपयांपर्यंत बोनस देखील मिळण्याची शक्यता आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबी करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. घरबसल्या रोजगाराची संधी मिळाल्यामुळे बेरोजगारी कमी होणार असून कुटुंबाच्या उत्पन्नात महिलांचा मोठा हातभार लागणार आहे.