महाराष्ट्रातील पूरस्थिती चिंताजनक; CM फडणवीसांनी केंद्राकडे मागितली तातडीची मदत

26 Sep 2025 20:32:22
 
PM Modi CM Fadnavis
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या चार दिवसांपासून अविरत पाऊस पडत असून, यामुळे जनजीवनावर आणि शेतीवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक भागांमध्ये घरांवर पूरचा प्रचंड फटका बसला असून शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
 
केंद्राकडे मदतीसाठी पत्र-
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र पाठवले. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान भेटीचे आयोजन झाले. पत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरही माहिती दिली आहे.
 
50 लाख हेक्टर शेती प्रभावित-
पत्रानुसार, महाराष्ट्रातील 31 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या अखेरीपर्यंत पाऊस सुरू राहण्यामुळे अंदाजे 50 लाख हेक्टर शेतीची जमीन नुकसानग्रस्त झाली आहे. या परिस्थितीमुळे लाखो शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात आली आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी SDRF मधून 2,215 कोटी रुपये वाटप केले आहेत; तरीही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
 
पत्रातील प्रमुख मुद्दे-
महाराष्ट्रातील 31 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सातत्याने मुसळधार पावसामुळे शेतीला प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे.
 
राज्य सरकारने SDRF अंतर्गत 2,215 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वाटप केले आहे.
 
केंद्र सरकारकडून NDRF अंतर्गत अतिरिक्त आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तू, पशुधन हानी भरपाई व मालमत्तेची पुनर्बांधणीसाठी मदत मागितली आहे.
वामानाचे अंदाज गंभीर असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत अत्यावश्यक आहे.
 
राज्य सरकारच्या संसाधनांनिशी पूरक मदतीसाठी NDRF अंतर्गत अतिरिक्त आर्थिक सहाय्य त्वरित पाठवण्याची विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0